भिवकुंड विसापूर येथील हनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस बल्लारपूर पोलिसांनी केले अटक
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर : भिवकुंड नाला विसापुर येथील मंदिरातील हनुमान ची मुर्तीची विटंबना १९ ऑक्टोबर ला अज्ञात व्यक्तीने केली होती. पोलीस ठाणे बल्लारपुर येथे अपराध क्रं ९७१/२०२४ कलम २९८ बी. एन. एस. २०२३ अन्वये गुन्हा नोद केला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन आरोपी निष्पन्न करुन आरोपीस २५ ऑक्टोबर ला अटक करण्यात आले.सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता, त्याचा व त्याचे पत्नीचा वाद झाल्याने व कौटुंबीक कलहामुळे त्याची पत्नी त्यास सोडुन तिचे माहेरी बाबुपेठ चंद्रपुर येथे गेली होती. व तेथुन तिची आत्या राहणार बल्लारपुर हिचे घरी मुक्कामी गेली असता, आरोपी हा पत्नीचे शोधात मोटार सायकलने चंद्रपुर येथुन बल्लारपुर जात असतांना, सैनिक स्कुल जवळ त्याची मोटार सायकलची एक्सलेटर वायर तुटल्याने त्याने सदर मोटार सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन मंदिराजवळ जावुन चंद्रपुर कडे जाणाऱ्या वाहन चालकाकडे लिफ्ट मागत होता. त्यास कोणीही लिफ्ट न दिल्याने व पहिलेचे कौटुंबिक कलहामुळे त्याने रागाचे भरात जवळच असलेल्या मंदिरातील हनुमान ची मुर्ती तोडुन व ती गाभाऱ्या बाहेर फेकुन मुर्तीची विटंबना केली. व तेथुन पायदळ चालत घरी चंद्रपुर येथे निघुन गेला. पोलीसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीस अटक केले. हनुमान मूर्तीच्या विटंबना विरोधात १९ ऑक्टोबर ला चक्का जाम तसेच २१ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर शहर बंद चे आवाहन केले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात पो. नि. सुनिल वि. गाडे, सपोनि. अंबादास टोपले, सफौ. गजानन डोईफोडे, आंनद परचाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पोअं. विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, भुषण टोंगे, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु यांनी केले.